Help लॉगिन





प्रबोधिनी बद्दल


संस्थेची स्थापना

  मूळ स्थापना -विभागीय आयुक्त ,अमरावती यांनी अमरावती विभागातील महसूल व ग्रामीण विकास खात्यातील अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक १५ जानेवारी ,१९९० साली "आरती" (Amravati Regional Training Institute) या नावाने प्रशिक्षण केंद्र स्थापन केले .

  या प्रशिक्षण केंद्राला शासनाने शासन निर्णय ,सामान्य प्रशासन विभाग, दिनांक ०७ डिसेंबर ,१९९६ नुसार विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती असे नामकरण करून या संस्थेची विदर्भाकरिता स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून (यशाच्या धर्तीवर ) स्थापना कऱण्यात आली .

  तद्नंतर शासन निर्णय ,सामान्य प्रशासन विभाग, दिनांक ०९ सप्टेंबर, १९९७ अन्वये संस्थेचे डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती असा नामविस्तार करण्यात आला .

  सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १४ ओक्टोबर, २०१३ अन्वये या संस्थेला राज्ज्य प्रशिक्षण धोरणाअंतरंगत अमरावती विभागासाठी विभागीय प्रशासकीय व प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले .


संस्थास्थापनेचा ऊद्देश

  विदर्भातील विविध खात्यांचे अधिकारी /कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना प्रशिक्षण देऊन लोकाभिमुख प्रशासनाचा अंतिम ऊद्देश साध्य करणे.

  कार्यालयीन काम कराण्यांच्या प्रणालीमधे सुधारणा घडाऊन आणणे आणि अधिकारी /कर्मचारी यांचे ज्ञान व कौशल्य व्यक्तिगत व सांघिक पातळीवर वाढविणे.

  अधिकारी /कर्मचारी यांचे विचार करणायचा प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणणे याकरिता नियमित कालावधीने प्रशिक्षण देणे .


संस्थेची रचना

  पालक  मा.मंत्री.ग्रामविकास ,मा.मंत्री.वने व मा. राज्य मंत्री, सामान्य प्रशासन.

  नियामक मंडळ  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मा.अपार मुख्य सचिव ,सामान्य प्रशासन (सेवा), मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ.

  कार्यकारी समिती  प्रबोधिनीचे व्यवस्थापन व प्रशासनाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मा.विभागीय आयुक्त, अमरावती यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती.

  संचालक  प्रबोधिनीचे दैनंदिन कामकाज संचालक हे पार पाडतात.


संस्थेकडील उपलब्ध संसाधन

परिसर

  सद्यस्थितीत प्रबोधिनी ४. ७० हेक्टर परिसरामध्ये विस्तारलेली आहे .

  संस्थेचा परिसर हा मुखत्वे तीन भागात ,यात प्रशिक्षण व प्रशासकीय परिसर ,निवासी परिसर आणि क्रीडा परिसर अश्या तीन भागात विभागल्या गेला आहे .

  या व्यतिरिक्त प्रबोधिनीच्या परिसराला लागून असलेली १७०० चौ . मी. जागा वितरित झाली आहे .